लोणी काळभोर : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव धोंडकर यांच्या आईचे दुखःद निधन झाल्यामुळे सभापती दिलीप काळभोर यांचे सह्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी आज होणारी संचालक मंडळाची बैठक तहकूब करण्यात आली आहे. आता हि बैठक 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
पुणे कृषी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढण्यासाठी दहा संचालकांनी बाजार समितीच्या सचिवांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या संदर्भात बैठक बोलावण्याचा निर्णय बाजार समितीच्या सचिवांनी घ्यावा असा आदेश पणन संचालक विकास रसाळ यांनी दिला होता. या निर्णया विरोधात सभापती दिलीप काळभोर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. न्यायालयाने पणन संचालकांचा निर्णय कायम ठेवत ते अपिल फेटाळून लावले होते.
त्यामुळे सभापती दिलीप काळभोर यांचा सह्यांचे अधिकार काढण्याबाबत बैठक बोलाविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आज संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु बाजार समितीचे सचिव धोंडकर यांच्या आईचे दुखःद निधन झाल्याने आजची बैठक तहकूब करण्यात आली. हि बैठक आता 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
पुणे बाजार समितीच्या उपसभापती सारीका हरगुडे, मनिषा हरपळे, प्रकाश जगताप, नितीन दांगट, प्रशांत काळभोर, दत्तात्रय पायगुडे, अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे, लक्ष्मण केसकर, शशिकांत गायकवाड या दहा संचालकांनी सह्यांचे अधिकार काढण्याची मागणी केली आहे. त्यामुळे 7 ऑगस्ट रोजी होणा-या बैठकीत सभापती दिलीप काळभोर यांचे सह्यांचे अधिकारी काढण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.