चिखली: सिमेंटचे पाईप बनविण्याच्या कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 28 हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले आहे. ही घटना 12 जानेवारी रोजी खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात घडली. याप्रकरणी ईश्वर अंकुश गीते (वय 38, रा. चिखली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कुरकुंडी गावात सिमेंट पाईप बनविण्याचा कारखाना आहे. कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 28 हजार रुपये किमतीच्या सिमेंट पाईप बनवण्याच्या साच्याच्या 19 रिंग चोरून नेल्या आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.