– संतोष पवार
पळसदेव (पुणे) : येथील पळसनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पतंजली योग समितीचे योगप्रशिक्षक रामराव जाधव, मधुकर पाटील विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांसमवेत अनुलोम, विलोम, कपालभारती, ताडासन, वज्रासन, मयूरासन, सूर्यनमस्कार आदि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी योगासने आवश्यक आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यानी नियमितपणे योगासने सर्वांगसुंदर व्यायाम करणे आवश्यक आहे, असे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, अशोक जाधव, वृषाली काळे, उज्जवला वाघमारे, सुवर्णा नायकवाडी आदिंसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.