पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी सायंकाळी गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री नाना पेठमध्ये घडली होती. सदर प्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. वनराज यांची हत्या होण्यापूर्वी घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं, याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणाचा शोध पुणे पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात उभे होते. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही वेळाने परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. आंदेकर यांच्यावर हल्ला करताना नेमका वीजपुरवठा खंडित कसा काय झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचा अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोरांना त्यांची हत्या करुन गोळ्या झाडल्या. त्यानंतर घटनास्थाळावरुन हल्लेखोर अंधारात पसार झाले.
दरम्यान, नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.