पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने पुण्यासह विविध शहरांमध्ये छापे टाकून बेकायदा बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने 26 सप्टेंबर रोजी देशभरातील 32 ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणात सीबीआयने पुण्यातून 10 जणांना अटक केली आहे. हैदराबादमधून 5 तर विशाखापट्टणममधून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने पुण्यासह हैदराबाद, वाराणसी, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद शहरात छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या कॉल सेंटरमधून 50 मोबाईल, 38 संगणक आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
आरोपींकडून एमएसवीसी इन्फ्रॉमेट्रिक्स प्रा. लि., आत्रिया ग्लोबल सर्विसेस प्रा. लि. आणि विआजेस सोल्यूशन्स या नावाने बनावट कॉल सेंटर चालविण्यात येत होते. आरोपींनी रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअरचा वापर करून परदेशी नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करून आरोपींनी दोन परदेशी नागरिकांची 20 हजार डॉलर्सची फसवणूक केली होती.
सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये असे आढळून आले की, चार कॉल सेंटर्सच्या माध्यमातून 170 लोक या ऑनलाईन गुन्हेगारीच्या घटनांत सहभागी आहेत. यात प्रमुख आरोपी असलेल्या 26 जणांना सीबीआयने अटक केली आहे.
CBI conducted a multi-city operation targeting a highly organised cybercrime network involved in fraudulent activities targeting victims globally. CBI conducted coordinated searches at 32 different places across Pune, Hyderabad, Ahmedabad and Vishakhapatnam from the late evening… pic.twitter.com/EDMnSZrwDX
— ANI (@ANI) September 30, 2024