पुणे : कधी दबंग, तर कधी लेडी सिंघम अशी ओळख निर्माण करून पोलिसांचा खाक्या दाखवत गुन्हेगारासाठी कर्दनकाळ ठरलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर, भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून भाग्यश्री नवटक्के त्यावेळी कार्यरत होत्या.