पुणे : माथाडीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्यांवर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. शेखर मारूती लोंढे (37, रा. नागपुर चाळ, जुना जकात नाक्याच्या पाठीमागे, येरवडा) असं कारवाई केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येरवडयातील वुडन स्ट्रीट फर्निचर प्रा.लि. क्रियेटीसिटी मॉल यांच्या वेअर हाऊस वरून फर्निचर मटेरियल घेवुन आलेल्या ट्रकमधील फर्निचर तक्रारदार यांच्या कामगारांना खाली करू न देता त्यांची स्थानिक असल्याचे सांगुन लोंढेने आडवणुक केली होती. तक्रारदार यांच्याकडे प्रति महिना १८ हजार रूपये तसेच त्यांच्या कंपनीचे हाऊसकिपिंगचे आणि लेबर कॉन्ट्रक्ट स्वतःला मागुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत होता.
त्याबाबतची तक्रार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीचा तपास केला असता आरोपी लोंढेने तक्रारदार यांच्याकडून १२ हजार रूपये घेतल्याचे समोर आले. लोंढे याच्याकडे तक्रारदाराच्या कंपनीची माथाडी संदर्भात कोणतीही वर्क ऑर्डर नसल्याचे तसेच तो माथाडी बोर्ड या ठिकाणी नोंदीत कामगार नसल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.