शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथील भैरवनाथ मंदिर जवळ राहणारे रामहरी हरगुडे यांनी त्यांची (एम एच १२ एन ई ८५८) इनोव्हा कार त्यांच्या घराच्या बाहेर पार्किंगमध्ये लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास रामहरी घराबाहेर आले असता, त्यांना त्यांची कार दिसली नसल्याने त्यांनी सर्वत्र कारचा शोध घेतला असता कार कोठे मिळून आली नाही. त्यानंतर त्यांची कार चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत रामहरी विश्वनाथ हरगुडे (वय ३९ वर्षे रा. सणसवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दामोदर होळकर हे करत आहे.