पुणे : पूर्वी झालेले वाद, मतभेद आता मिटवून टाकूया, असे सांगत मतभेद मिटवण्यासाठी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला बोलावून घेत, सहा जणांच्या टोळक्याने तिला लाकडी पट्टीने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप शाळेच्या मुख्य गेटसमोर घडली.
रविवारी (ता. २५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी सुरज दोरकर (वय-१९, रा. हडपसर), वैष्णव साळुंखे (वय-१८, रा. एच.बी.सी बिल्डींग, हराबाग चौक, शुक्रवार पेठ) व त्यांच्या इतर चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांना रेणुका स्वरुप शाळेच्या मुख्य गेट समोर बोलावून घेतले. त्याठिकाणी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवागाळ केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या लाकडी पट्टीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले.