आळेफाटा : आळेफाटा पोलिसांनी बस स्थानकावर चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी कारवाईत ७ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.२७ डिंसेंबर रोजी विजय औटी हे आळेफाटाहून मुंबईला जाण्यासाठी अहमदनगर – कल्याण एस.टी.मध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पळवली. या बाबतची फिर्याद त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे चोर चारचाकी गाडी घेऊन चोरी करत असल्याचे निर्देशनास आले. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी ७ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.
रामेश्वर जाधव (रा.शिरापुर या.शिरूर कासार), विकास गायकवाड (रा.दहिटना बु.ता.घनसांगवी जि.जालना), आकाश जाधव (रा.सलगरा बु.लातूर), दिपक जाधव (रा.शिरापुर धुमाळ ता.शिरूर कासार). सागर झेंडे (रा.अंबिका चौक बाब), जालिंदर डोकडे (रा.शिरूर कासार), अरिफ रेहमान शेख( रा.मोमिन पुरा बिड) या सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपींनी आळेफाटा पोलीस हद्दीत ४ गुन्ह्यामध्ये साडे सात तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचे कबूल केले.
चोरलेले सोने आकाश बेंद्रे रा.बिड यास विकले होते. त्यशिवाय पोलिसांनी गुन्ह्यातील वापरलेली बोलेरो देखील ताब्यात घेतली. असा ऐकून ८ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करून आरोपींस अटक करण्यात आली आहे.