मंचर : अवसरी बुद्रुक येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रेरणा नवनाथ हिंगे ही जिद्द व चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी पोलीस कॉन्स्टेबल झाली असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेरणा हिचे वडील घरची शेती बघून खासगी बसवर चालक म्हणून काम करतात. तर, आई अनिता या गृहिणी असून टेलरिंगचा व्यवसाय करतात. प्रेरणाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक येथे झाले आहे. बारावीनंतर पारगाव येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेत पोलीस भरतीची तयारी सुरू केली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोलीस भरतीत पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून तिची निवड झाली आहे.