शिक्रापूर : शिरुर लोकसभा निवडणुकीत एका वधूने लग्न मंडपात जाण्याआगोदर मतदान केंद्रावर जाणे पसंत केले. साक्षी पंचमुख या नव वधूने मतदानाचा हक्क बजावला. करंदी (ता. शिरुर) येथील साक्षी पंचमुख या युवतीचा सोमवारी (दि.१३) शिरुर लोकसभा मतदान प्रक्रियेच्या दिवशी विवाह होता. गावामध्ये मतदान प्रक्रिया होत असताना साक्षीने आपले पवित्र मत देण्याचा विचार करुन स्वतःच्या लग्नाला जाण्यापूर्वी आधी मतदान मग लग्न मंडप असा निर्णय घेतला. डोक्याला बांधलेल्या मुंढवळ्यासह मतदान कें द्र गाठले. यावेळी मतदान केंद्रावर वधू आल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी साक्षीने मतदान केले व त्यानंतर विवाह स्थळ गाठले, असल्याने साक्षीच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.