Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात उपविभागीय सहकारी संस्थेत लाचखोरीचा प्रकार उघडकीस; तिघांविरोधात कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 June 2025, 23:13

पुणे: पुण्यातील दापोडी येथील उपविभागीय सहकारी संस्थेत लाच मागणीचा प्रकार घडल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. तक्रारदार यांनी नवीन सामाजिक संस्थेची नोंदणी करण्यासाठी प्रसार व स्वयंशासन विभागाच्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४/०३/२०२४ रोजी उपविभागीय सहकारी संस्था कार्यालय, दापोडी, पुणे येथे त्यांनी लोकसेवक श्रीमती संगीता सुभद्रा बाबुराव किरवले-चौधरी, सहकारी अधिकारी श्री मुकुंद विमल भास्कर पवार यांना संस्थेच्या नोंदणीसाठी संबंधित कागदपत्रे सादर केली होती. संस्थेसाठी आवश्यक असलेली प्रवेश फी ५०० रुपये व वार्षिक सभासद फी ११,२०० रुपये अशी रक्कम भरून, तसेच एकूण १६ सभासदांची यादी सादर करण्यात आली होती.

या फाईलवर स्वाक्षरी घेण्यासाठी तक्रारदार कार्यालयात गेले असता, सहकारी अधिकारी संगीता सुभद्रा बाबुराव किरवले-चौधरी यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. यानंतर दिनांक २६/०६/२०२४ रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने विभागाने प्राथमिक चौकशी केली असता, आरोपी सहकाऱ्याने तक्रारदाराकडून ३००० रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच उप-उपनिबंधक श्री मुकुंद विमल भास्कर पवार यांनीही ३००० रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात आरोपी लोकसेवक संगीता सुभद्रा बाबुराव किरवले-चौधरी, मुकुंद विमल भास्कर पवार व एका अज्ञात लोकसेवकाने एकत्र येऊन तक्रारदाराकडून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदाराच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित अधिकारी व उप-उपनिबंधक यांनी प्रत्येकी ३००० रुपये लाचेची मागणी केल्याची माहिती मिळाली. लाच मागणी संदर्भात विभागाने सापळा रचून कारवाई केली असून, संबंधितांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. या प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी अशा घटनांबाबत तत्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14

‘माझं लग्न जमत नाही, मला आयुष्य संपवायचंय’ नैराश्यातून पुण्यातल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 13 June 2026, 14:30

रांजणगाव एमआयडीसी मधील औषध कंपनीला २५ लाखांची खंडणीची मागणी

Saturday, 13 June 2026, 14:10

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर…

Saturday, 13 June 2026, 14:01
Next Post

आज 'या' चार राशींवर पडेल पैशांचा पाऊस; वाचा तुमचे राशिभविष्य काय सांगते?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.