हनुमंत चिकणे
Sad News : उरुळी कांचन, (पुणे) : दौंड तालुक्यातील डाळिंब येथे आई व मुलाचा एक तासाच्या अंतराने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना आज रविवारी (ता. २८) घडली आहे. या घटनेने डाळिंब, उरुळी कांचनसह परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. (A mother and son died of a heart attack within an hour at Dalimb near Uruli Kanchan.)
कृष्णाबाई आत्माराम म्हस्के (वय- ७५) व राजेंद्र आत्माराम म्हस्के (वय – ५५, रा. विठ्ठलबन, डाळिंब, ता. दौंड) असे एक तासाच्या अंतरात निधन झालेल्या मायलेकांची नावे आहेत.
डाळिंब, उरुळी कांचनसह परिसरात हळहळ…
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाबाई म्हस्के यांना मागील तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. ( Breaking News) त्यामुळे त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सिध्दीविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसेच उपचाराला साथही दिली. रविवारी सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र म्हस्के हे काम करीत असताना अचानकपणे जमिनीवर कोसळले.
राजेंद्र म्हस्के यांना तात्काळ उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.( Breaking News) तसेच एक तासाच्या अंतराने राजेंद्र म्हस्के यांच्या मातोश्री यांचेही सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
दरम्यान, आई व मुलाचा एका तासाच्या अंतरानेच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दोघांच्या पार्थिवावर डाळींब बन येथे अंत्यसंस्कार सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहेत.कृष्णाबाई म्हस्के यांच्या पश्चात तीन मुली, नातवंडे, सुन, असा आप्तपरिवार आहे. डाळिंब बन येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागर म्हस्के यांच्या त्या चुलती होत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :