पुणे Breaking News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. (Breaking News) या घोषणेमुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. (Breaking News) पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपला निर्णय मागे घेण्यासाठी भावनिक आवाहन केले. ‘सिल्व्हर ओक’बाहेर कार्यकर्त्यांनी धरणं देऊन बसले आहेत. (Breaking News) तर कार्यकर्ते घरासमोरून हलण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यावर आता शरद पवारांनी मोठी निर्णय घेतला आहे. (Breaking News)
अजित पवार म्हणाले
पवार साहेब असा निर्णय घेतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केले होते. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत. ‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी दिल्याचे अजित पवारांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असेही पवारांनी सांगितल्याचे अजित पवारांनी सांगितले.
त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी धरणं धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी राजीनामा देत असल्याती घोषणा केली. यामुळे कार्यकर्त्यांसर नेत्यांना देखील अश्रू अनावर झाले. पवारांनी आपला निर्णय बदलावा, यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे ??