मांजरी (पुणे)- हवेली बाजार समितीचे विद्यमान संचालक व कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रोहिदास उंद्रे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, कारखान्याच्या सहागटापैकी सर्वात जास्त लक्षवेधी ठरलेल्या कोलवडी, मांजरी-वाघोली या गटात रोहिदास उंद्रे यांचा मोठा पराभव झाला असुन, या गटात “शेतकरी विकास आघाडी” चे किशोर शंकर उंद्रे व रामदास सिताराम गायकवाड हे दोन्ही उणेदवार मोठ्या मताधिक्कयाने विजयी झाले आहेत. तर अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे रोहिदास उंद्रे यांच्यासह आनंदा देवराम पवार पराभुत झाले आहेत.
दरम्यान, कोलवडी, मांजरी-वाघोली या गटातील विजयी उमेदवार किशोर शंकर उंद्रे यांना ५२१२ तर रामदास सिताराम गायकवाड यांना ५२६२ मते मिळाली. तर पराभुत उमेदवार रोहिदास उंद्रे यांना ५१२० तर आनंदा पवार यांना ४१०० मते मळाली.
कारखान्याचे एकुन सहा गट असुन, सहा पैकी आत्तापर्यंत पाच गटाचे निकाल जाहीर झाले असुन, उरुळी कांचन-शिंदवने, सोरतापवाडी, नायगाव-कोरेगाव मुळ, लोणी काळभोर-थेऊर, हडपसर – मांजरी-फुरसुंगी व कोलवडी, मांजरी-वाघोली या महत्वाच्या पाच गटांचा निकाल जाहीर झाला असुन, पाच गटातील तेरापैकी बारा जागा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” या पॅनेलने जिंकल्या असुन, केवळ लोणी काळभोर गटातील एकाच जागेवर रयत सहकारी पॅनेलचा उमेदवार विजयी झालेला आहे.
दुसरीकडे कारखाना चालु करणारच अशी टॅगलाईन घेऊन, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल” मोठा पराभाव स्विकारावा लागला आहे.
उरुळी कांचन-शिंदवने या दोन नंबर गटामध्ये शेतकरी विकास आघाडीचे संतोष आबासाहेब कांचन यांना सर्वाधिक ५६७० मते मिळवुन विजयी झाले असुन, त्यांच्या खालोखाल सुनिल सुभाष कांचन यांना ५४९६ मते तर सुशांत सुनिल दरेकर यांना ५०८० एवढी मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे पराभुत उमेदवारांच्या पैकी विकास विलास आतकिरे यांना सर्वाधिक ४८६५ तर दुसरे पराभुत अजिंक्य महादेव कांचन यांना ४४९७ मते तर तिसरे उमेदवार अमित भाऊसाहेब कांचन यांना ४१९६ एवढी मते मिळाली आहेत.
सोरतापवाडी, नायगाव व कोरेगाव मुळ या गट क्रमाक दोन मधील “शेतकरी विकास आघाडी” चे शशिकांत मुरलीधर चौधरी (५२११), विजय किसन चौधरी (५२५२) तर याच गटातील तिसरे उमेदवार ताराचंद कोलते ५१०५ मते मिळवुन विजयी झाले आहेत. तर पराभुत लोकेश कानकाटे (४४८३), राजेंद्र चौधरी (४७३३) तर तिसरे पराभुत उमेदवार मारुती चौधरी यांना ४३३१) मते मिळाली आहेत.
लोणी काळभोर-थेऊर या तीन नंबर गटात “अण्णासाहेब मगर रयत सहकार ” या पॅनेलचे नवनथ तुकाराम काकडे विजयी झाले आहेत. याच पॅनेलचे दिग्गज उमेदवार तथा हवेली बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब रंगनाथ काळभोर व राहुल मधुकर काळभोर या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या गटातील विजयी उमेदवार मोरेश्वर पांडुरंग काळे यांना ५२६८ तर योगेश प्रल्हाद काळभोर यांना ४९५१ मते मिळाली. तर नवनाथ काकडे यांना ५१३१ एवढी मते मिळाली. तर पराभुत उमेदवार अप्पासाहेब रंगनाथ काळभोर यांना ४७९९ , राहुल मधुकर काळभोर यांना ४३३० तर अमर काळभोर यांना ४८४२ मते मिळाली.
यशवंतच्या निवडणुकीत उमेदवार म्हणुन एका खाजगी कारखान्याचे मालक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने, प्रतिष्ठेच्या बनलेल्या हडपसर – मांजरी, फुरसुंगी या चार नंबर गटातही शेतकरी विकास आघाडी पॅनेलचेअमोल प्रल्हाद हरपळे व राहुल सुभाष घुले हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. अमोल प्रल्हाद हरपळे यांना ५४०८ तर राहुल सुभाष घुले यांना ५५०२ मते मिळाली आहेत. तर खाजगी कारखान्याचे मालक व यशवंतचे माजी संचालक राजीव शिवाजीराव घुले यांना ४७७४ मते तर सुरेश फकीरराव कामठे यांना ४४८० मतांच्यावर समाधान मानावे लागले आहे.