Breaking News पुणे : पतीसह त्याच्या ५ मित्रांनी महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मार्केटयार्डातील संदेशनगर परिसरात घडली आहे. (Breaking News) आणि त्या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Breaking News)
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी २३ वर्षीय पिडीतेच्या वडिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिडीत मुलीचा पती व त्याचे मित्र शैलेंद्रकुमार, अतिशयकुमार, पवन राजेंद्र परदेशी, जितेंद्रकुमार, विजय बन्सी पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा २७ फेब्रुवारी २०२० ते २०२१ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा औरंगाबाद येथील गारखेडा येथील एका मुलाबरोबर विवाह झाला होता. विवाहानंतर मुलीचा पती तिला वारंवार मारहाण करत होता. त्यामुळे फिर्यादी फिर्यादी यांनी आपल्या मुलीला स्वत:च्या घरी आणले.
फिर्यादी यांची मुलगी पुण्यात असताना २० फेबुवारी २०२० रोजी तिच्या पतीने तिला घराबाहेर बोलावले. तिला झुडपामध्ये नेऊन तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. तिला हाताने व काठीने मारहाण केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. आणि त्याचे त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. आणि आरोपींनी सन २०२० व २०२१ मध्ये वारंवार बोलावून गाडीमध्ये अश्लिल चित्रे दाखवून तिच्यावर सर्वांनी वारंवार बलात्कार केला.
दरम्यान, पोलिसांकडे तक्रार दिल्यास फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. त्यानंतर पिडीतेनी ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.