Breaking News : पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राहुल कुल यांची आज (ता. ४) जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली. जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे बळ मिळणार आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिले निवडीचे पत्र!
भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली आहे. (Breaking News ) यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे. यामुळे कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरित्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आमदार राहुल कुल यांच्याकडे बारामती लोकसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी आहे. आता पूर्ण जिल्ह्याची समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे बळ मिळणार आहे.
या निवडीबाबत आमदार राहुल कुल यांना विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने माझ्यावर संघटनात्मक समन्वयाची जबाबदारी दिली असून, ही जबाबदारी मी निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे. केंद्र व राज्य सरकारची विकासकामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारी नेमणुकीनंतर पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर जिल्हा समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. (Breaking News ) याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मी आभारी आहे. त्यांनी दिलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवणार असल्याचेही कुल यांनी या वेळी बोलताना सांगितले.