मुंबई : बॉक्सिंगच्या प्रशिक्षणासाठी येत असलेल्या १२ वर्षांच्या मुलीचा प्रशिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार माझगावमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून भायखळा पोलिसांनी बॉक्सिग प्रशिक्षक साहिल बापरकर (२२) याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १२ वर्षांची मुलगी माझगाव येथे बॉक्सिग प्रशिक्षणासाठी जात होती. बापरकर हा तेथे प्रशिक्षक म्हणून काम करत होता. फेब्रुवारी ते जून दरम्यान बापरकरने अनेक वेळा पीडित मुलीला प्रशिक्षण संपल्यावर थांबवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. बापरकरने केलेल्या शारीरिक संबंधांच्या मागणीला नकार दिल्याने त्याने तिला मारहाण केली. भायखळा पोलीस ठाण्यात बापरकरविरोधात तक्रार करण्यात आली.