राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील एका महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना यवत वरून राहू येथे येत असताना बागवस्ती जवळ १५ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून दोन आरोपींना यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. सिंदबाद जैन पवार (वय-३०) व गणेश भारत पवार (वय-२४ , दोघे रा. वाखारी, ता दौंड, जि पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत येथील एका महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे गंठण चोरून नेले. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी सिंदबाद पवार आणि गणेश पवार यांना चौफुला येथून ताब्यात घेऊन चौकशी केली.
यावेळी ६ मार्च २४ रोजी यवत गावच्या हद्दीतील श्रेयस हॉटेल जवळ रामदास शेंडगे (रा. उंडवडी ) यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठीची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे गंठण, सोन्याची चैन व मोटार सायकल असा एकुण २ लाख ६७ पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश माने, पोलीस हवालदार संजय देवकाते, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चांदणे, मारूती बाराते, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली.