पुणे : महिलेचा वेळोवेळी पाठलाग करुन तसचे तिच्यासोबत अश्लील भाषेत बोलून विनयभंग केल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात घडला. जून २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मुळशी तालुक्यातील बावधन येथील पुलाजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिलेने गुरुवारी (ता. ११) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुभाष देवकर (वय-४०, रा. ग्रामपंचायत, बावधन चावडी, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष देवकर याने फिर्य़ादी यांचा वेळोवेळी कमावरुन घरी जाताना दुचाकीवरुन पाठलाग केला. तसेच फिर्यादी यांचा रस्त्यात हात पकडून शरीराला अश्लील स्पर्श करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच शारीरिक संबंधाची मागणी केली. महिलेकडे पाहून अश्लील बोलून व हावभाव करुन विनयभंग केला. आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून अखेर महिलेने गुरुवारी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.