युनूस तांबोळी
शिरूर : वंसत ऋतुची चाहुल लागताच डोंगर, वन, शेतशिवार परीसरात बहरलेला पळस लक्ष वेधून घेतात. सध्या लाल, केशरी रंगाने फुललेला पळस ठिकठिकाणी बहरलेला पहावयास मिळत आहे. चांडोह ( ता. शिरूर ) येथील या पळसाच्या फुलांनी सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
रंगाची उधळण करणारी होळी सण ( रंगपंचमी ) जवळ आला की हमखास आठवण येते ती पळसाच्या फुलांची. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानावनात बहरणारी लाल केसरी फुले वसुंदरेचे सौंदर्य खुलवतात. लाल केसरी पळस फुले जंगलात, शेतशिवारावर सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात. मात्र ‘पिवळा पळस’ हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधासाठीही या फुलांचा बहुआयामी उपयोग आहे. असे तज्ञ सांगतात.
पिवळ्या पळसाबद्दल काही अंधश्रद्धा मानल्या जातात…
पळस फुलांना ‘प्लेम आफ फॅारेस्ट’अर्थात जंगलातील ज्वाला अशी इंग्रजांनी उपमा दिली आहे. पळसाला जसा आकार नाही तसाच त्याच्या आकर्षक फुलांना गंधही नाही. परंतू फुललेला पळस सर्वांनाच आवडतो. पळस फुलताच शेतशिवार लाल फुलांनी न्हाऊन निघते. डोळ्यात भुरळ घालणारा लाल केशरी पळस बहरला असल्याचे चांडोह गावचे सामाजीक कार्यकर्ते बाबाजी वडने यांनी सांगितले.
बहुउपयोगी असणारा पिवळा पळस जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे जतन, वंवर्धन करणे गरजचे आहे. या वर्षी येणाऱ्या पावसात पिवळ्या पळसांच्या बिया गोळा करून पावसाळ्यात त्याचे बीजारोपन करणे गरजेचे आहे. असे पर्यावरण प्रेमी सुनील जाधव व पोलिस पाटिल सुदर्शन भाकरे यांनी सांगितले.