सागर जगदाळे
Blood Donation Camp | भिगवण : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भिगवण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन भिगवण येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेने केले होते. नागरिकांनी या शिबिराला उत्सुर्त प्रतिसाद नोंदविला. तर मराठा महासंघाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
भिगवण येथील शिबीर छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा जैन संघटनेचे अध्यक्ष सचिन बोगावत, भिगवण गावचे सरपंच प्रतिनिधी प्राचार्य तुषार क्षिरसागर, साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव, मुस्लिम समाज बांधव सलीम सातारे, भिगवण ग्रामपंचायत सदस्य जयदीप जाधव, सत्यवान भोसले, दत्तात्रय धवडे, मराठा महासंघाचे तालुका महिला अध्यक्ष डॉ. पद्मा खरड, सचिव ऍड. ज्योती जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्षय रक्तपेढीच्या माध्यमातून ५१ बाटल्या रक्त संकलित…
दरम्यान, हडपसर येथील अक्षय रक्तपेढीच्या माध्यमातून ५१ बाटल्या रक्त संकलित केल्या आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालय वैद्यकीय मदत कक्षाचे भिगवण येथील प्रमुख विशाल धुमाळ यांनी यावेळी दिली.
शिबिराचे संयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ऍड पांडुरंग जगताप, राजकुमार मस्कर, तुषार चव्हाण, छगन वाळके, प्रशांत गायकवाड यांनी केले होते. तर शिबिर यशस्वी होण्याकरिता महासंघाचे डॉ. अजय थोरात, अशोक साळुंखे, भरत मोरे, रामचंद्र कदम, उमेश डिडवळ, सुनील काळे, सुभाष फलफले, दीनानाथ मारणे, दत्तात्रय जाधव, ग्रंथपाल दादा रणसिंग यांनी विशेष सहकार्य मिळाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
भिगवण रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मोफत आरोग्य शिबीर
Bhigwan News | भिगवण मेडिकल असोसिएशन स्पार्टन चॅम्पियन क्रिकेट चषकाचे मानकरी