पुणे : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि तांबा स्थानक (दौंड-मनमाड सेक्शन) दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याचे रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. १ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस, निजामाबाद. पुणे एक्स्प्रेस, भुसावळ- दौंड डेमू व दौंड भुसावळ डेमू या गाड्या २३ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच ६, १३, २० मार्चला पुणे जबलपूर एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ३:५५ मिनिटे उशिरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. ७, १४, २१ मार्चला पुणे लखनौ एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४:३० उशिरा सुटणार असून, ही गाडी दुपारी ३:२५ ला सुटणार आहे.
पुणे हटिया एक्स्प्रेस पुणे स्थानकातून सुटणारी १, ५, ८, १२, १५, १९ आणि २२ मार्चला आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४:४० मिनिटे उशिरा सुटणार आहे. ही गाडी दुपारी ३:२५ वाजता सुटणार आहे. याशिवाय दि. ४, ११, १८ रोजी सुटणारी पुणे हटिया एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४.४० मिनिटे उशिरा सुटणार असून, संध्याकाळी ३:२५ वाजता सुटणार आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेतील सोलापूर मिनिटे विभागाच्या बेलापूर, चितळी आणि पंतांबा (दौंड मनमाड सेक्शन) दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी ट्रॅफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक १ मार्च ते २३ मार्च २०२३ या कालावधीपर्यंत असणार आहे. या कामासाठी चार गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास होणार आहे.