पुणे : दुहेरीकरणाच्या कामासाठी १० ते २५ जानेवारी दरम्यान सोलापूर रेल्वे विभागातील दौड ते मनमाड रेल्वे स्थानका दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्या या रद्द तर काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा देखील बदलल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. १० जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दौंड-निजामाबाद डेमु तसेच १२ ते १९ जानेवारी दरम्यान दौड-भुसावळ-दौड मेमू रद्द करण्यात आली आहे.
२१ आणि २३ जानेवारी व २३ ते २५ दरम्यान कोल्हापूर-गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाड़ी रद्द करण्यात आली आहे.
“या” गाड्यांच्या मार्गात बदल?
पुणे- अमरावती (१८ जानेवारी), पुणे-नागपूर (१९ जानेवारी), अमरावती-पुणे (१९ जानेवारी), पुणे अजनी (२० जानेवारी), नागपूर पुणे (२१ जानेवारी), पुणे अजनी (२१ जानेवारी), अजनी पुणे (२२ जानेवारी), अजनी पुणे (२४ जानेवारी) या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित मार्गाने न जाता लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड या मार्गाने धावणार आहेत. तर २२ जानेवारी रोजी हवडा पुणे, हटिया पुणे या दोन्ही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
नागपूर बल्लारशाह कजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौड, पुणे आदी मार्गाने या गाड्या धावणार आहेत. तर २३ जानेवारी रोजी हजारत निजामुद्दीन म्हैसूर एक्सप्रेस ही रेल्वे रतलाम, वडोदरा, वसई रोड, पनवेल, कर्जत, लोणावळा पुणे मार्गे धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.