Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात पुन्हा भाजपचीच ‘पॉवर’? 11 प्रभागांमध्ये बदल, महापालिकेसाठी कोणत्या ठिकाणी काय बदल? वाचा संपूर्ण यादी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 October 2025, 17:41
BJP's 'power' again in Pune? Changes in 11 wards, what changes for the Municipal Corporation in which places? Read the complete list

Photo-Social Media

पुणे: राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेची (Pune News) अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून, निवडणुकीच्या तयारीतील हा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रारूप आराखड्याच्या तुलनेत 11 प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक बदल प्रभाग क्रमांक 38 (आंबेगाव-कात्रज) आणि प्रभाग क्रमांक 15 (नऱ्हे-वडगाव बुद्रुक) येथे झाले आहेत. याशिवाय आठ प्रभागांच्या नावांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.

प्रारूप आराखड्यावर जवळपास 6 हजार हरकती दाखल झाल्या होत्या. अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या हरकतींवर सुनावणी घेत आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. या अहवालानुसार आयोगाने आवश्यक बदल करून अंतिम आराखड्यावर शिक्कामोर्तब केले.

अंतिम रचनेत सर्वाधिक बदल दक्षिण पुण्यात झाले आहेत. प्रभाग क्रमांक 38 (आंबेगाव-कात्रज) हा पाच सदस्यीय प्रभाग आहे. या प्रभागामध्ये बालाजीनगर, आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव दबाडी (शिवसृष्टी) हे भाग जोडण्यात आले आहेत. तसेच प्रारूप आराखड्यात नऱ्हे-वडगाव बुद्रुक प्रभागात असलेले कोळेवाडी आणि जांभूळवाडीचे क्षेत्र आता या प्रभाग क्रमांक 38 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रभाग आकाराने लहान विधानसभा मतदारसंघाइतकाच मोठा बनला आहे.

 

बालाजीनगरचे तुकडे प्रारूप आराखड्यात वेगवेगळ्या प्रभागात गेले होते. मात्र, अंतिम रचनेत बालाजीनगर एकत्रितपणे प्रभाग 38 मध्ये सामील करण्यात आला आहे. त्यामुळे येथे अनेक दिग्गज आमनेसामने येण्याची शक्यता असून, निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या बदलांमुळे शेजारील पाच प्रभागांतही फेरबदल करावे लागले.

खराडी-वाघोली प्रभागातील मतदारसंख्या वाढवण्यासाठी मांजरी बुद्रुक आणि साडेसतरा नळी येथील काही भाग जोडण्यात आले आहेत. रामटेकडी-माळवाडी, वानवडी-साळुंकेविहार, गुरुवार पेठ-घोरपडे पेठ आणि रविवार पेठ-नाना पेठ या ठिकाणी तुटलेले प्रगणक गट एकत्र करण्यात आले आहेत.

प्रभाग क्रमांक 1 (कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित) येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशी दोन आरक्षणे पडली आहेत. त्यामुळे सर्वसाधारण गटातून लढणाऱ्या किमान एका उमेदवाराला फटका बसणार आहे. 2017 च्या निवडणुकीत अशीच परिस्थिती तत्कालीन प्रभाग क्रमांक 7 (विद्यापीठ-वाकडेवाडी) येथे निर्माण झाली होती.

प्रारूप आराखड्यात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व दिसून आले होते. अंतिम रचनेत फारसे मोठे बदल झाले नसल्याने भाजपचा वरचष्मा कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधकांच्या काही प्रभागात बदल झाले असले तरी भाजपमध्ये होणाऱ्या ‘इनकमिंग’चा विचार करता पक्षाची स्थिती अधिक मजबूत राहणार असल्याचे संकेत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमची गाडी किती जुनी आहे? केंद्र सरकार आणतंय ‘PUCC 3.0’; जाणून घ्या आता गाडीच्या नियमात काय बदलणार

Tuesday, 23 June 2026, 22:53

पुण्यात लुटेरी दुल्हनचा कारनामा! तरुणाला जाळ्यात ओढलं, बनावट विवाह रचला अन् घरी परतताना फरार…

Tuesday, 23 June 2026, 22:31

पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका! 15 गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार एटीएसच्या जाळ्यात

Tuesday, 23 June 2026, 21:38

नागपूरची कमान आता नांगरे पाटलांच्या हाती! 14 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न

Tuesday, 23 June 2026, 20:51

सोने सांगवीत सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भिंतीवर आदळला,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tuesday, 23 June 2026, 20:46

उरुळी कांचन येथे दुचाकी गाडीच्या डिक्कीतून भरदिवसा 81 हजार रुपये पळवले; उरुळी कांचन पोलिसांचा फिर्यादीला ‘लोणीकंद’ला जाण्याचा सल्ला..

Tuesday, 23 June 2026, 20:19
Next Post
Bhivandi News: Anger over an old quarrel; went into the house, beat and abused the family, as soon as the friend got off the bike....

जुन्या भांडणाचा मनात राग; घरात गेले, कुटुंबियांना मारहाण अन् शिवीगाळ केली, मित्र दुचाकीवरून उतरताच त्याला....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.