Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्या भांडणाचा मनात राग; घरात गेले, कुटुंबियांना मारहाण अन् शिवीगाळ केली, मित्र दुचाकीवरून उतरताच त्याला….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 October 2025, 17:55
Bhivandi News: Anger over an old quarrel; went into the house, beat and abused the family, as soon as the friend got off the bike....

Photo-Social Media

भिवंडी: भिवंडी शहरातील (Bhivandi News) शांतीनगर परिसरात किरकोळ (Bhivandi Crime) वादातून झालेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. मित्रांनीच मित्राचा जीव घेतल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिशान अन्सारी (वय 25) या तरुणाची हत्या झाली असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिशान अन्सारी आणि त्याचे परिचित हसन मेहबुब शेख (22), मकबुल मेहबुब शेख (30) व हुसेन मेहबुब शेख (28) हे तिघे भाऊ एका गोदामात हमालीचे काम करीत होते. काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. तो वाद मिटल्याचे भासले असले तरी हसन व त्याच्या भावांनी मनात राग धरला होता. अखेर शनिवारी त्यांनी त्याचा सूड उगवला.

सायंकाळच्या सुमारास हसन, मकबुल, हुसेन यांच्यासह सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजिद हे पाच जण जिशानच्या घरी पोहोचले. त्यांनी घरात घुसून जिशानच्या कुटुंबीयांवर शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी जिशान दुचाकीवरून घरी आला. तो वाहनावरून उतरताच हसनने त्याला जोरदार लाथ मारली. ती लाथ थेट वर्मी लागल्याने जिशान जमिनीवर कोसळला. गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला. प्रारंभी हा प्रकार वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा वाटला. मात्र प्राथमिक तपासात हल्ला नियोजित असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी हसन मेहबुब शेख, मकबुल मेहबुब शेख, हुसेन मेहबुब शेख, सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजिद या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या घटनेमुळे शांतीनगर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्याकांडामुळे स्थानिक नागरिकांत संताप असून, समाजातील तरुणवर्गाच्या वाढत्या आक्रमक वृत्तीबाबत चिंता व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
More than 1,111 conch players set a world record in Pune! Recorded in the 'World Record Book of India'

पुण्यात 1,111 हून अधिक शंखवादकांनी घडवला विश्वविक्रम! 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'मध्ये नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.