Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे दुचाकी गाडीच्या डिक्कीतून भरदिवसा 81 हजार रुपये पळवले; उरुळी कांचन पोलिसांचा फिर्यादीला ‘लोणीकंद’ला जाण्याचा सल्ला..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 June 2026, 20:19

उरुळी कांचन, (पुणे) : जिल्हा बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वृद्धाने दुचाकीच्या डिक्कीत कष्टाने आणलेली 81 हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात भामट्याने डिक्कीचे लॉक तोडून कडक लंपास केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 23) भर दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे मोरीजवळील कोतवाल हॉटेल परिसरात घडली आहे.

विशेष म्हणजे चोरी झाल्यानंतर तातडीने तपास चक्र फिरवण्याऐवजी उरुळी कांचन पोलिसांनी हद्दीचे कारण पुढे करत फिर्यादीला लोणीकंद पोलीस ठाण्यात पाठवल्याने, आधीच हतबल झालेल्या वृद्ध लकडे कुटुंबाला मानसिक त्रासाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बापू आबाजी लकडे (वय 60, रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे) असे अज्ञात चोराने डिक्की फोडून रक्कम चोरलेल्या हतबल ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. बापू लकडे हे उरुळी कांचन येथील नामांकित ‘बायफ’ संस्थेत कर्मचारी म्हणून कामाला होते आणि सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत.

 

बापू लकडे यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत, हे चेक करण्यासाठी ते आपले मित्र शांताराम बबन लोंढे यांच्यासोबत दुचाकीवरून आले होते. घरातून निघताना त्यांनी कर्ज फेडण्यासाठी 81 हजार रुपयांची रोख रक्कम सोबत घेतली होती आणि ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती.

उरुळी कांचन येथील बँक ऑफ इंडियाचे काम आटोपून बापू लकडे आणि त्यांचे मित्र ही रक्कम अष्टापूर फाटा येथील जिल्हा बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून निघाले. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे मोरीजवळ असलेल्या ‘कोतवाल हॉटेल’च्या बाहेर दुचाकी लावून दोन्ही मित्र चहा पिण्यासाठी थांबले. मात्र, दुर्दैवाने 81 हजारांची कडक रक्कम त्यांनी डिक्कीतच ठेवली होती.

चहा पिऊन झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून आष्टापूरच्या दिशेने निघून गेले. आष्टापूर जिल्हा बँकेच्या बाहेर जेव्हा त्यांनी दुचाकी लावली, तेव्हा त्यांना दुचाकीच्या डिक्कीचे लॉक कडक तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. बापू लकडे यांनी तात्काळ डिक्की उघडून पाहिली असता, आतील 81 हजार रुपयांची कॅश अज्ञात चोरट्याने मधल्या वेळात लंपास केल्याचे उघड झाले.

या कडक चोरीनंतर बापू लकडे यांनी आपल्या मुलाला तात्काळ फोन करून बोलावून घेतले. लकडे कुटुंबीयांनी तात्काळ उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठून घडलेल्या चोरीची सविस्तर माहिती दिली आणि गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र, उरुळी कांचन पोलिसांनी “हा गुन्हा अष्टापूर फाट्यावर घडला आहे, त्यामुळे तुम्ही लोणीकंद पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंद करा,” असा सल्ला देऊन आपले हात झटकले.

दरम्यान, चोरी उरुळी कांचन हद्दीतील कोतवाल हॉटेलबाहेर झाली की आष्टापूरला, या तांत्रिक वादात पोलिसांनी वृद्ध फिर्यादीला वाऱ्यावर सोडल्याने लकडे कुटुंबीय कडक हतबल झाले आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका! 15 गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार एटीएसच्या जाळ्यात

Tuesday, 23 June 2026, 21:38

नागपूरची कमान आता नांगरे पाटलांच्या हाती! 14 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न

Tuesday, 23 June 2026, 20:51

सोने सांगवीत सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भिंतीवर आदळला,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tuesday, 23 June 2026, 20:46

उरुळी कांचन येथे दुचाकी गाडीच्या डिक्कीतून भरदिवसा 81 हजार रुपये पळवले; उरुळी कांचन पोलिसांचा फिर्यादीला ‘लोणीकंद’ला जाण्याचा सल्ला..

Tuesday, 23 June 2026, 20:19

“याआधीही सियाने केतनला दरीत ढकललं होतं” केतनच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले “तो एका झाडामुळे वाचला होता…”

Tuesday, 23 June 2026, 19:53

खासदार बजरंग बाप्पाच्या लेकावर खुनाचा आरोप? “हॉटेल मालक हत्या प्रकरणातील सूत्रधारावर गुन्हा दाखल करा” नातेवाईक आक्रमक

Tuesday, 23 June 2026, 19:09
Next Post

सोने सांगवीत सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भिंतीवर आदळला,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.