पुणे : बारामतीमध्ये भाजप चांगलं काम करत होते, त्यामुळेच अजित पवारांना इकडे यावं लागलं असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. तसेच बारामतीमध्ये आमच्या विचाराचा खासदार होणार हे एक लाख टक्के खरं आहे. तो भाग्यवान कोण असेल मला माहित नाही, असंही पडळकर म्हणाले. ते बारामती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार सत्तेत आल्यापासून मी बारामतीला आलो नव्हतो. पण अजून लोकांच्या संपर्कात आहे. बारामतीत दुष्काळ आहे, सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे. मराठवाड्याला पाणी देण्याची कल्पना आली, बारामतीच्या पाण्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आणण्यासाठी परदेशात गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं राज्यकारभार सांभाळायला सक्षम आहेत. विरोधकांचा जनधर संपला आहे, त्याच्यामुळे विरोधक अशा टीका करत आहेत. विधानसभावर जाणे प्रत्येकचे स्वप्न असते, पक्ष माझा विचार करेल.
बारामतीत भाजप चांगले काम करीत होते, त्यामुळे अजित पवारांना इकडे यावं लागले. भाजपचे खासदार दिल्लीत पाठवायची जबाबदारी आमची आहे. इथे आमच्या विचाराचा खासदार होणार हे 1 लाख टक्के खरे आहे. तो भाग्यवान कोण असलं मला माहित नाही, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
तसेच मराठा आरक्षणावर देखील त्यांनी भाष्य केलं म्हणेल, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण ओबीसीमधून द्यायला आमचा विरोध आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. धनगर समाजाच्या आरक्षण संदर्भात आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयात आमच्या बाजूनं निकाल लागेल असे आम्हाला वाटतंय. मराठा समाजाचा प्रश्न वेगळा आहे तो समजून घेतला पाहिजे, असे पडळकर म्हणाले.