दौंड : भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि दौंडचे माजी तालुकाध्यक्ष तानाजी दिवेकर तसेच त्यांचे सहकारी सुनील खंडाळे आणि एका अज्ञातावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महिलेने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही गर्भवती आहे. ती एप्रिल महिन्यात केडगाव येथील हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथून जाताना या महिलेच्या पतीला तानाजी दिवेकर यांचा फोन आला. त्यानंतर काही वेळातच दिवेकर हे सुनिल खंडागळे आणि एका व्यक्तीबरोबर इनोवा कारमधून त्याजागी पोहोचले. त्यादरम्यान, याच कारमधून दिवेकर आणि हे सर्वजण केडगाव पोलीस चौकीजवळ आले. त्यावेळी संबंधित महिलेच्या पतीने जो काही विषय आहे तो आपण गाडीत बसून बोलूयात सांगितले.
दरम्यान, तक्रारदार महिला आणि तिचा पती हे दोघेजण देवकर यांच्या गाडीमध्ये बोलण्यासाठी जाऊन बसले. त्यावेळी दिवेकर यांनी तक्रारदार महिलेचा विनयभंग केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. अशी माहिती महिलेने यवत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस अधिकारी उत्तम कांबळे करीत आहेत.