मावळ: आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघ कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपने कंबर कसली असून मावळ आणि रायगड लोकसभा भाजपला मिळावा यासाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करावेत असा सूर कार्यकर्त्याचा होता.