BJP News | बारामती : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर विरोधी पक्षावर चांगलीच टीका करत असतात. त्यांच्या टीकेमुळे ते चांगलेच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला असून जहरी टीका केली आहे.
जनाब बाळासाहेब ठाकरे लिहण्यापासून ते उर्दूमध्ये त्यांचे पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांचे विचार परिवर्तन झाले आहे. हिंदुत्वापासून ते कोसो दूर गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने या देशात हिंदुत्वाचे काम करत होते. त्याच्याबरोबर विरूद्ध दिशेला उद्धव ठाकरे यांची विचारसरणी गेली आहे.
आता त्यांच्याकडे पर्याय नाही. हिंदुत्व त्यांच्याकडे राहिले नाही. त्यामुळे अशा लोकांना बरोबर घेतल्याशिवाय त्यांना त्यांचे राजकारण करता येणार नाही. असी टीका पडळकर यांनी केली आहे.
बारामती-इंदापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या ५२ शाखांचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते रविवारी झाले, यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुरंदर येथील सभेला आले होते. तेंव्हा त्यांची या उपसा योजनेचे दर कमी केले. जानाई-शिरसाई पट्ट्यातील गावांमध्ये सुद्धा दुष्काळ आहे. एकिकडे देशातील मान्यवर नेत्यांचा तुम्ही बारामतीला आणायचे, स्वत:चे कौैतुक करून घ्यायचे, पाठ थोपटून घ्यायची, असा टोला पडळकर यांनी पवार कुटूंबाला लावला. या भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर येथील गाऱ्हाणी घालण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत, असे पडळकर यावेळी म्हणाले.
पडळकर म्हणाले, ‘ भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या ५२ शाखा बारामती-इंदापूरमध्ये सुरू करण्यता आल्या आहेत. ‘मिशन बारामती लोकसभा’यासाठी या शाखा सुरू करण्यात आल्या नाहीत. तर भाजपचे हे रूटीन वर्क आहे. वर्षातले ३६५ दिवस भाजप या पद्धतीने काम करते. गावगाड्यातील विविध प्रश्न या शाखांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व तरूणांची फळी उभी करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. पळशी येथे आम्ही शाखा उद्घाटनासाठी गेलो होते.