दिनेश सोनवणे
दौंड : आज सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असल्याचे चित्र आहे. दौंड तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीचे निकाल झाले असून देवकरवाडी, दहिटणे, नांदूर, बोरिभडक व लोणारवाडी या ठिकाणी भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. एका ठिकाणी राष्ट्रवादी, एका ठिकाणी अपक्ष तर एक जागा निरंक आहे.
देवकरवाडी येथील निवडणुकीत भाजपाच्या तृप्ती दिगंबर मगर यांची सरपंचदासाठी निवड करण्यात आली आहे. दहिटणे येथून भाजपाच्या उमेदवार आरती गायकवाड यांनी १६३ मतांनी विजय साकारला.
नांदूर येथून भाजपाचे युवराज बोराटे व बोरीभडक येथून कविता बापू कोळपे यांनी विजय मिळवला आहे. तर लोणारवाडी येथील निवडणुकीत प्रतीक्षा हिवरकर यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.
डाळिंब ग्रामपंचायतमध्ये अपक्ष उमेदवार बजरंग म्हस्के तर दापोडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आबा गुळामे हे विजयी झाले आहेत. पाटेठाण ग्रामपंचायतीतून केवळ एकच अर्ज करण्यात आला होता. मात्र तो अर्ज छाननीत बाद करण्यात आल्याने सरपंचपद निरंक राहिले आहे.