Bhosari crime पिंपरी : तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने अवघ्या काही रोख रकमेच्या बदल्यात देण्याचे आमिष दाखवत ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम घेऊन ६५ वर्षीय महिलेची फसणूक केल्याची घटना समोर आली आहे. (Bhosari crime) ही घटना सोमवारी (ता.१५) भोसरी येथे घडली. (Biscuits of yellow metal given as gold; A 65-year-old woman was cheated)
या प्रकरणी महिलेने भोसरी (Bhosari crime) पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१६) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
६५ वर्षीय महिलेची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या भावाकडे जाण्यासाठी चाकण बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या जवळ अनओळखी दोघे जण आले. त्या दोघांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेच्या बदल्यात पंधरा तोळे सोन्याची बिस्कीटे देतो असे सांगितले. (Bhosari crime) फिर्यादी यांच्याकडील ७० हजार ३०० रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम आरोपींनी घेत त्यांना सोन्याची बिस्कीटे दिली. (Bhosari crime) मात्र, फिर्यादी यांनी नंतर या बिस्किट नीट पाहिली असता ती सोन्याची बिस्कीटे नव्हती पिवळ्या रंगाच्या धातुला सोन्याची बिस्कीटे म्हणून आरोपींना दिली हे लक्षात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक…
Hinjewadi Crime | वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात महिलेने केली बेदम मारहाण; हिंजवडीतील घटना…