पुणे : पुणे इसिस मॉड्युलप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडले होते. या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांनीही साताऱ्यातील सोन्याचे दुकान लुटले होते. सराफ दुकानातून लुटलेल्या सोन्याचा टेरर फंडिंगसाठी वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
पुणे पोलिसांनी मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या २ दहशतवाद्यांना १८ जुलै रोजी अटक केली होती. हे दोघेही मोस्ट वॉन्टेड आरोपी होते. इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले होते. संपूर्ण चौकशी केली असता. त्यांनी देशविरोधी कृत्य केल्याचं समोर आलं.
दरम्यान, हे प्रकरण एनआयएकडे पुढील तपासासाठी देण्यात आले होते. या दोघांनी टेरर फंडिंगसाठी एका सोन्याच्या दुकानात लूट केली होती आणि या सोन्याचा वापर टेरर फंडिंगसाठी केला होता. या दोन्ही दहशतवाद्यांचा आता पुणे पोलीस सखोल तपास करत आहेत.
पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्यासाठी हे दहशतवादी महाराष्ट्र-बेळगाव सीमा भागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला देखील होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली होते.
इसिस, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत, इसिस विलायत खोरासान आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान, सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. या सगळ्या संस्थांमध्ये हे दोघे काही प्रमाणात संलग्न असल्याचे समोर आले आहे.