पुणे : राज्य सरकारने अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने ईद- ए- मिलादच्या सुट्टीमध्ये बदल केला होता. सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ ची सुट्टी ही बुधवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आता ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती. ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज जारी केले आहेत. गणपती विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने काही मुस्लीम संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारची (ता, १६ सप्टेंबर) सुट्टी बुधवारी (१८, सप्टेंबर) देण्यात आली होती.
ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजी कायम..
मात्र आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती. त्यानुसार ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज जारी केले आहेत.
दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी ईद- ए- मिलादचा सण असून यादिवशी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जुलूस काढून सण साजरा करत असतात. मात्र १७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे. त्यामुळे दोन्ही सण शांततेत पार पडावेत, दोन्ही सणांमध्ये सलोखा कायम राहावा, यासाठी सोमवारची सुट्टी बुधवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र हा निर्णय फक्त मुंबई आणि उपनगरासाठी घेण्यात आला असून इतर जिल्ह्यांमध्ये सोमवारीच सुट्टी राहणार आहे.