पुणे : ॲक्सिस बँकेच्या ”एमसीएलआर” मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. बँकेच्या ”एमसीएलआर” मध्ये ०.१०% पर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर शनिवारपासून (ता.१८) लागू करण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या अनेक ग्राहाकांना मोठा धक्का बसला आहे.
”एमसीएलआर” म्हणजेच कर्ज दराची किरकोळ किंमत (Marginal Cost of Lending Rate) हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केले होते. बँक कोणत्याही ग्राहकाला या आधारभूत दरापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. बँका अनेकदा ”एमसीएलआर’ पेक्षा जास्त दराने कर्ज देतात. याच्या मदतीने बँका कर्जाचा दर ठरवतात. जेव्हा ते वाढते तेव्हा कर्ज महाग होते आणि जेव्हा ते कमी होते तेव्हा कर्ज स्वस्त होते.
ओवरनाइट दर 7.85 टक्के आहेत. एका महिन्याचे दर 7.85 टक्के, तीन महिन्यांचे दर 7.95 टक्के, सहा महिन्यांचे दर 8 टक्के, एक वर्षाचे दर 8.05 टक्के आहेत. दोन वर्षांसाठी 8.15 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.20 टक्के दर आहेत.
दरम्यान, कर्जाचे व्याजदर दोन प्रकारचे असतात. स्थिर व्याज दर आणि फ्लोटिंग व्याज दर. फिक्स्ड दरामध्ये कर्जाच्या संपूर्ण कालावधीत व्याज स्थिर राहते. तर, फ्लोटिंग रेट अंतर्गत, बँकेद्वारे वेळोवेळी व्याजदर बदलला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरणांमध्ये कोणताही बदल केल्यास फ्लोटिंग व्याजदर बदलतो. सामान्यतः फिक्स्ड रेट फ्लोटिंग रेटपेक्षा किंचित जास्त असतो.