Eknath shinde News : राज्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह वादळी पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान असून रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालं आहे.
यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. याचदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं आहे, त्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.