पुणे : पुण्यात आणि रिक्षाचालकांचा वाद हा हायकोर्टामध्ये पोहोचला होता. आता रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रॅपिडो कंपनीला आज दुपारी एक वाजेपासून बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.रा ज्यातील विविध शहरांमध्ये रॅपिडो कंपनीकडून बाइक टॅक्सी सेवा दिली जात आहे. मात्र, ही सेवा बेकायदेशीर असून, अशा प्रकारची सेवा देण्याचे धोरण राज्यात नाही, असे न्यायालयात परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
बाईक टॅक्सीसोबत कपंनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्यास कंपीनीची तयारी आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने ‘बाईक टॅक्सी’बाबत एक स्वतंत्र समिती तयार केली आहे. ही समिती लवकरच याबाबत आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली. मात्र तोपर्यंत ही सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी राज्य सरकारने सुद्धा केली होती. अखेरीस हायकोर्टाने रॅपिडोची सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहे. रॅपिडो सेवा बंद झाल्यामुळे पुण्यात रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.