पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काही संशयीत दहशतवादी घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील काऊंटरवर बंदूकीचा धाक दाखवून अरेरावी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या बातमीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णांना बाहेर काढण्यात येत आहे. बातमीनंतर रुग्णांमध्ये भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन तासासाठी कमला नेहरू रुग्णालय बंद करण्यात आलं आहे. पुढील सर्व तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.
एक जण फरार..
एक जण फरार होण्यात यशस्वी ठरल्याची माहिती मिळत आहे. ताब्यात घेण्यात आलेले संशयीत हे बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी कोणीही अतिरेकी नसल्याचे उघड झाले आहे.
उद्या देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात एका रुग्णालयात संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती समोर येते आहे. ही बाब पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्न उपस्थित करणारी मानली जात आहे.