पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यातील विद्यमान खासदारांचे पक्षांतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. यामुळे भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढल्याचे पहायला मिळत आहे. याला कारणही तसेच आहे. ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाही, त्या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या जवळपास डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती या सर्व्हेमधून मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजप खासदारांची धाकधूक वाढली आहे.
दरम्यान, भाजपकडून उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये डझनभर नावे नवीन दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या उमेदवारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे.
तिकिटे कापण्याची काय आहेत कारणे?
स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, ३ पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या जिल्ह्यांमध्ये बदलाची शक्यता
बीड
धुळे
सोलापूर
सांगली
लातूर
जळगाव
उत्तर मुंबई
उत्तर मध्य मुंबई
नांदेड
अहमदनगर
धुळे
वर्धा
रावेर