पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. त्यानुसार, प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत गुरुवारी (ता. २८) सकाळपासून शुक्रवारी (ता. २९) मिरवणूक संपेपर्यंत शहरातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. तसेच या कालावधीत पर्यायी मार्ग सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणते रस्ते राहणार बंद?
– लक्ष्मी रस्ता – संत कबीर चौकी ते टिळक चौक
– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता – काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक
– टिळक रस्ता – जेधे चौक ते टिळक चौक
– बगाडे रस्ता – सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक
– गुरूनानक रस्ता- देवजीबाबा चौक – हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक
(हे रस्ते गुरुवारी सकाळपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत.)
गुरुवारी दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणारे रस्ते
– गणेश रस्ता – दारूवाला पूल ते जिजामाता चौक
– केळकर रस्ता – बुधवार चौक ते टिळक चौक
गुरुवारी सायंकाळी 4 ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणारे रस्ते
– बाजीराव रस्ता – बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
– कुमठेकर रस्ता – टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
– शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक
– भांडारकर रस्ता – पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक
– पुणे-सातारा रस्ता – व्होल्गा चौक ते जेधे चौक
– सोलापूर रस्ता – सेव्हन लव्हज (ढोले पाटील) चौक ते जेधे चौक
– प्रभात रस्ता – डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक
हे असतील पर्यायी मार्ग…
कर्वे रस्ता – नळस्टॉप चौक – विधी महाविद्यालय रस्ता – सेनापती बापट रस्ता – सेनापती बापट रस्ता जंक्शन – गणेशखिंड रस्ता – सिमला ऑफिस चौक – संचेती हॉस्पिटल चौक – इंजिनिअरिंग कॉलेज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील शाहीर अमर शेख चौक – मालधक्का चौक – बोल्हाई चौक – नरपतगीर चौक – नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी – सेव्हन लव्हज चौक – वखार महामंडळ चौक