Big News : लोणी काळभोर : लोणीकंद -केसनंद रस्त्यावर गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना लोणीकंद (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील येथील मगर वस्तीजवळ शनिवारी (ता.३०) पहाटे दोन च्या सुमारास घडली आहे. या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली आहे. तर थेऊरकडे जाणारी-येणारी वाहतूक शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.
लोणीकंद -केसनंद रस्ता आज बंद. रस्त्यावर गॅस टँकर पलटी झाल्याचा व्हिडिओ पहा
अग्निशमन दल व भारत गॅसचे सुरक्षा व्यवस्थापक घटनास्थळी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद -केसनंद रस्त्यावर गॅस टँकर मध्यरात्रीच्या सुमारास पलटी झाला. टँकर मधून अत्यंत कमी प्रमाणात गॅस गळती होत आहे. (Big News ) त्यामुळे रात्रीच अग्निशमन दल व भारत गॅस चे सुरक्षा व्यवस्थापक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून उच्च दाब विद्युतवाहक तारा जात असल्याने महावितरणशी संपर्क करून विद्युत प्रवाह बंद केला आहे. सदर भागात घरे असणाऱ्या लोकांना सुरक्षा ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, गॅस कंटेनर पडला असल्याने लोणीकंद येथून थेऊरकडे जाणारी व येणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. हि वाहतूक शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरु होईल. (Big News ) तोपर्यंत वाहतूक खराडी बायपास मार्गे वळविण्यात आलेली आहे.
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे म्हणाले कि, मगर वस्ती लोणीकंद येथे भारत गॅस टँकर पलटी झाला व त्यातून अत्यंत कमी प्रमाणात गॅस गळती होत आहे. (Big News ) सदर रोडवरील वाहतूक दुसऱ्या ठिकाणी वळविण्यात आली आहे. त्यासाठी दहा चेक पॉईंट्स / पंक्चर पॉईंट्स वर अंमलदार पोलीस नेमले आहेत. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरणे सुरू झाले आहे. आपरेशन अजून ४-५ तास चालणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.