पुणे: पुण्यातील बनावट टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात मोठी माहित समोर आली आहे. चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांतून येणारे फोन स्थानिक नंबरवर पाठवून टेलिफोन एक्स्चेंज चालविणारा संशयित वर्षभरापासून कोंढव्यात वास्तव्यास होता अशी माहिती समोर येत आहे. नौशाद सिद्दीकी असे संशयिताचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे. कोंढव्यात सुरू असलेले बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर एटीएसने उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत तीन हजार 788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, नऊ वायफाय राऊटर्स, अँटेना आणि काही लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचा छापा..
पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद वस्तू आणि सामान जप्त करण्यात आले होते. या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड सात सिम बॉक्स वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना लॅपटॉप सह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आला आहे.
विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू करण्यात आलं होतं. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम.ए.कॉम्प्लेक्स परिसरात अधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होतं. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ माजली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी करत आहेत.