संदीप बोडके
थेऊर, ता.२१ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांना अखेर शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कवडे यांच्या निलंबनाचा आदेश पारित केला आहे. कवडे यांना तीन वर्षांत दोन वेळा निलंबित केल्याने त्यांची एकूणच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.Big Breaking
मौजे भोसरी येथे एकाच गावात, एकाच गट नबंरमधील फेरफारबाबत जयश्री कवडेंनी तीन वेळा आदेश पारित केले होते. त्यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर थेऊर मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असताना १३ मार्च रोजी त्यांच्यासह त्यांच्या दोन बगलबच्च्यांवर ७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा एसीबीने दाखल केला. मात्र, कवडे या त्या दिवसापासून फरार असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांचे १९ मार्चला निलंबन केले आहे. Big Breaking
दरम्यान, जयश्री कवडे यांच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कवडे या गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच १३ मार्च २०२४ पासून आढळून आलेल्या नाहीत, तसेच त्यांनी कार्यालयाशी कोणताही संपर्क साधलेला नसल्याने त्यांना शासन सेवेतून गुन्हा दाखल झालेच्या दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबीत केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्या निलंबीत राहतील, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशात नमूद केले आहे.
काय आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…
* थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचे मुख्यालय तहसिल कार्यालय जुन्नर हे राहिल.
* जुन्नर तहसिलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
* निलंबन कालावधीत कवडे यांनी खासगी नोकरी स्विकारु नये किंवा धंदा करु नये, त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांचेविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
– नोकरी केल्यास कवडे निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील. Big Breaking
– निलंबन कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता जेव्हा जेव्हा देण्यात येईल त्यावेळी खासगी नोकरी स्विकारली नाही किंवा खासगी धंदा व व्यापार करीत नाही, अशा तऱ्हेचे प्रमाणपत्र जयश्री कवडे यांनी द्यायचे आहे.