Big Breaking जेजुरी : जेजुरी यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१७) घडली आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. (Big Breaking) जखमी झालेल्या भाविकांचा जेजुरी देवस्थान वतीने उपचाराचा खर्च देण्यात येणार आहे. अशी माहिती मिळत आहे. (Big Breaking)
निलेश अरुण मोरे (वय-३०) विशाल मोरे, माऊली मल्हार मोरे व मयांक सचिन कदम (वय १३) अशी जखमी झालेल्या भाविकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुदैवत खंडेरायाच्या उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा दुपारी १ वाजता गडकोटातून बाहेर पडला. त्यानंतर हा सोळला गणेश मंदिराकडून बानूबाई मंदिराकडे जात असताना अचानक गर्दीचा लोंढा आला. सोहळ्यासमोर सनई चौघाडा वाजवण्याचा मान असणाऱ्या गडाशी समाजातील वादकांवर लोंढा आल्याने चेंगराचेंगरीच्या प्रकार घडला.
या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. यात निलेश मोरे यांच्या छातीला जोराचा मार बसल्याने बरगड्या फ्रॅचर झाल्या आहेत. विशाल मोरे चेंगराचेंगरीत खाली पडल्यामुळे यांच्या कपाळाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूला ही मार लागला आहे. माऊली मोरे यांच्या खांद्याला जबर मार लागल्याने खांद्यातून हात निखळला. तर मयांक सचिन कदम याच्या हाताचे हाड मोडले आहे.
या सर्वांना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमींवर उपचारासाठी यंत्रसामुग्री नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या वेळी देवाची पालखी खांद्यावर पेलून धरणाऱ्या खांदेकरी मानकाऱ्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून थोडावेळ पालखी थांबून सावरली. अन्यथा मोठी गंभीर घटना घडली असती.
दरम्यान, मार्तंड देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे आणि विश्वस्त अड् पांडुरंग थोरवे यांनी येथील खासगी हॉस्पिटल मध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. जखमींना आधार देताना देव संस्थान च्यावतीने संपूर्ण वैद्यकीय खर्च करणार असल्याचे सांगितले.