Big Breaking News : पुणे : पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ असलेल्या किलोमीटर ४१ येथे दरड कोसळल्याची घटना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आडोशी बोगद्याजवळ असलेल्या किलोमीटर ४१ जवळ रात्री दरड कोसळली आहे. (Big Breaking News ) दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रस्त्यावर पडलेले दगड हटवण्यासाठी जेसीबी आणि ट्रक घटनास्थळी दाखल झाले आहेत, पण पावसामुळे दरड हटवण्यामध्ये व्यत्यय येत आहे.
दरम्यान, दरड कोसळल्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्या आहेत, तर पुण्याला जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली
लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत ही दरड खूपच कमी होती. (Big Breaking News ) आता लोणावळा लगतच्या मार्गावरील दरड हटविल्याचं यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. या दरडीमुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ही वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे. असं यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.