Big Breaking | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर जाण्याची बातमी ताजी असतानाच दुसरी एक माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.शिंदे हे नाराज असल्याने सुट्टीवर गेल्याची चर्चा रंगली आहे. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा थांबत नसतानाच ते महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.
1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे.मात्र या सभेला अजित पवार नसतील, असा खळबळजनक दावा संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय शिरसाट म्हणाले, ‘एक तारखेच्या वज्रमुठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही. अजित पवार लवकरच सरकारमध्ये सहभागी होणार आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. मला एकवेळ मंत्रिपदाची हाव असू शकते, पण अजित पवारांना मंत्रिपदाची हाव नाही, असं वक्तव्यही शिरसाट यांनी केलंय.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ajit Pawar : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला ३५१ कोटींचा ढोबळ नफा : अजित पवार…