लोणी काळभोर, ता.२५ : गणपतीच्या आरतीला घर बंद करून गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेच्या जवळील घर फोडून रोख रकमेसह सोन्याच्या दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.२५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आहे.
अजित अंगत यशवंत (रा.कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित यशवंत हे कोरेगाव मूळ येथे कुटुंबासोबत राहतात. सोमवारी यशवंत हे कुटुंबासोबत गणपतीच्या आरतीला घर बंद करून गेले होते.
यशवंत हे आरती झाल्यानंतर घरी आले असता, त्यांना घरातील समान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी घरातील कपाटात ठेवलेली ३० हजार रोख रक्कम व अर्धा तोळे सोने आढळून आले नाही. तसेच घरातील कपडेही चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ही चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळत आहे.