पुणे : भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. डेक्कन परिसरात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने ही जागा महापालिकेने सील केल्याची माहिती मिळत आहे.
महानगरपालिकेकडून गेले काही दिवस पुण्यात कर थकबाकीदारांवर कारवाया सुरू आहेत. ज्या ठिकाणी कोट्यावधी कर थकीत आहेत, त्यांच्यावर अशी ही कारवाई केली जात आहे. अशा कारवाई करताना आधी नोटिफिकेशन पाठवण्यात येते आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली जाते. राणे यांच्यावरील कारवाई मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली आहे. या जागेवर तब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी होती. सध्या पुणे महापालिका थकित करप्रकरणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत आहे.
दरम्यान, याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले की, महापलिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात गैर काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर त्याची वेगळी बातमी झाली असती. आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार आहोत.
डेक्कन परिसरामध्ये एक मोठा मॉल आहे. यात रेंटवर अनेक वे दुकाने आहेत. याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करताना पुणे महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी पोहोचले होते, त्यांनी ही कारवाई केली.